corona virus -दापोलीतील २६ जणांना तीन दिवसांत केले होम कोरोन्टाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:17 AM2020-03-21T11:17:36+5:302020-03-21T11:21:02+5:30

जिल्ह्यातील दापोली येथे कोरोना सदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून सुमारे २६ जणांना होम कोरोन्टाईन करण्यात आल्याची माहिती दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी दिली. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद केली जात नसल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

corona virus | corona virus -दापोलीतील २६ जणांना तीन दिवसांत केले होम कोरोन्टाईन

corona virus -दापोलीतील २६ जणांना तीन दिवसांत केले होम कोरोन्टाईन

Next
ठळक मुद्देदापोलीतील २६ जणांना तीन दिवसांत केले होम कोरोन्टाईनएकही संशयित नाही : दुकाने बंद न केल्यास कारवाई

दापोली/रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली येथे कोरोना सदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून सुमारे २६ जणांना होम कोरोन्टाईन करण्यात आल्याची माहिती दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी दिली. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद केली जात नसल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या भागातील तीन किलोमीटरचा परिसर आयसोलेट करण्यात आला आहे. तसेच पुढील दोन किलोमीटरचा परिसरसुद्धा बफरझोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, दापोलीत कोरोना संदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून तीन दिवसांत एकूण २६ जणाना होम कोरोन्टाईन करण्यात आल्याची माहिती दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी दिली आहे. कोरोन्टाईन केलेल्यांमध्ये काही नागरिक विदेशी तर काही नागरिक स्थानिक आहेत. असे अ सले तरी दापोली तालुक्यात अद्याप कोणीही कोरोना संशयित नसल्याची माहितीही तहसीलदार घारे यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी हॉटेल, बार, टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेत नसलेले दुकान बंद करत नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी शरद पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

परदेशातून आलेल्या व्यक्तींनी तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. परदेशातून आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती लपविल्यास आणि त्यानंतर त्यांच्याबाबतीत माहिती उपलब्ध झाल्यास त्यांच्यासह कुटुुंबियांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले आहे.

Web Title: corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.