Corona Virus: रत्नागिरीत सर्वच शाळा बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 10:43 PM2022-01-05T22:43:12+5:302022-01-05T22:51:39+5:30
Corona Virus: काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
रत्नागिरी : जिल्ह्यात काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे गुुरुवार, ६ जूनपासून जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी यांचे पुढील आदेश देईपर्यंत या शाळा बंद राहणार आहेत.
काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार आहे. तसेच केवळ लस घेण्यासाठीच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात, असे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी दिले आहेत