corona virus : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे थैमान, आणखी ४० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:10 PM2020-07-06T18:10:55+5:302020-07-06T18:12:32+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ४० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५० झाली आहे़ सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर आणि जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि त्यांच्या संपर्कातील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे़.
रत्नागिरी : जिल्ह्यात आणखी ४० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५० झाली आहे़ सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर आणि जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि त्यांच्या संपर्कातील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे़.
आरोग्य विभागातच कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा भीतीच्या छायेत वावरत आहे़ सोमवारी आलेल्या अहवालांमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालयातील सापडलेल्या २ रुग्णांमध्ये डॉक्टर आणि त्यांची पत्नी असलेली सिस्टरचाही समावेश आहे़ तसेच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि शनिवारी सापडलेल्या वॉर्डबॉयच्या संपर्कात आलेल्या आणखी ३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे़
रत्नागिरीत ८ रुग्ण आढळून आलेल्यांमध्ये राजेंद्रनगर, श्रीरामनगर, सन्मित्रनगर, मच्छीमार्केट या भागातील नवीन रुग्ण आहेत़ चिपळूण तालुक्यातील कामथे येथील १४, खेड तालुक्यातील कळंबणी येथील १५ रुग्ण तर दापोली तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे़