corona virus : रत्नागिरीत कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 01:46 PM2020-06-23T13:46:01+5:302020-06-23T13:47:36+5:30

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तपासणी केंद्रातून मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखीन ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९३ इतकी झाली आहे. तर मंगळवारी आणखीन दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून २३ झाली आहे.

corona virus: Increase in the number of coronavirus patients in Ratnagiri | corona virus : रत्नागिरीत कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या संख्येत वाढ

corona virus : रत्नागिरीत कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या संख्येत वाढ

Next
ठळक मुद्देरत्नागिरीत कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या संख्येत वाढआणखीन दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या झाली २३, नवीन अहवालानुसार ९ जण पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील तपासणी केंद्रातून मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखीन ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९३ इतकी झाली आहे. तर मंगळवारी आणखीन दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून २३ झाली आहे.

गेले दोन दिवस जिल्हा रुग्णालयातील तपासणी मशीन बंद पडल्याने अहवाल प्राप्त झाले नव्हते. सोमवारी सायंकाळी हे मशीन सुरू झाल्यानंतर तपासणीचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखीन ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये दापोली तालुक्यातील आडे येथे १ आणि दाभोळ येथील २, संगमेश्वर तालुक्यातील कडवईत १, अंधेरी - कारभाटलेत १, तिवरेवाडीत १, लांजा तालुक्यातील इसवली येथे १, रत्नागिरीतील निवळीफाटा - हातखंबा येथे १ आणि जयगड येथील एकाचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांपैकी आणखीन दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत झालेल्या रुग्णांमध्ये चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथील ७२ वर्षीय पुरूषाचा तर खेडमधील शिवतर येथील ४४ वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबईतून गावी आले होते.


जहाजातील आणखीन एक पॉझिटिव्ह

जयगड येथील जहाजातून आलेल्यांपैकी आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नव्याने आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा यापूर्वी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, तो अन्य चार पॉझिटिव्ह रुग्णांसोबत गणपतीपुळे येथील हॉटेलमध्ये राहिला होता. सुरक्षेसाठी त्याला रत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथून पुन्हा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे.

Web Title: corona virus: Increase in the number of coronavirus patients in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.