corona virus : चाचण्या तेवढ्याच; तरीही घटले रुग्ण, रत्नागिरीकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 05:36 PM2020-10-20T17:36:17+5:302020-10-20T17:44:05+5:30

croronavirus, hospital, ratnagiri रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी अजूनही जिल्हा आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असलेल्या संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेणे कमी झालेल्या नाहीत. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे.

corona virus: as many as tests; Still relieved patients, Ratnagirikar | corona virus : चाचण्या तेवढ्याच; तरीही घटले रुग्ण, रत्नागिरीकरांना दिलासा

corona virus : चाचण्या तेवढ्याच; तरीही घटले रुग्ण, रत्नागिरीकरांना दिलासा

Next
ठळक मुद्देचाचण्या तेवढ्याच; तरीही घटले रुग्ण, रत्नागिरीकरांना दिलासा प्रादुर्भाव कमी करण्यात यंत्रणेला यश

रहिम दलाल

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी अजूनही जिल्हा आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असलेल्या संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेणे कमी झालेल्या नाहीत. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोनाच्या रुणांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हावासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जुलै महिन्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या १७७४ वरुन ऑगस्ट महिन्यात ती ३९३२ झाल्याने २१५८ रुग्ण संख्या वाढली होती. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये महिनाभराच्या कालावधीत ३४७६ रुग्णांची वाढ होऊन एकूण रुग्ण ७४०८ झाली.

त्याचबरोबर मृत्युचे प्रमाणही वाढले होते. जुलैमध्ये ५९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. ती संख्या ऑगस्टमध्ये १३५ झाली. तर सप्टेंबरमध्ये २६३ झाली. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात मृतांमध्ये २०४ रुग्ण वाढले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण आणि मृ्त्युचा आलेख कमी न होता उलट वाढला होता.

१९ सप्टेंबरपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मंदावली असून, ऑक्टोबर महिन्यात ही संख्या अजूनच घटत आहे. सध्या कोरोनाचे एकूण ८२३१ रुग्ण आहेत.

फळ, भाजीविक्रेते, व्यापारी यांची तपासणी

गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याची तपासणी केली जात होती. मात्र आता फळ, भाजीविक्रेते, व्यापारी यांची तपासणी होत आहे.
 

Web Title: corona virus: as many as tests; Still relieved patients, Ratnagirikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.