corona virus : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या अडीच हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 06:17 PM2020-08-13T18:17:57+5:302020-08-13T18:18:44+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बुधवारी रात्री जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी ९३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ५८० इतकी झाली आहे.

corona virus: The number of corona victims in Ratnagiri district has crossed two and a half thousand | corona virus : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या अडीच हजार पार

corona virus : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या अडीच हजार पार

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या अडीच हजार पारआणखी ९३ रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ५८०, मृतांची संख्या ८७

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बुधवारी रात्री जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी ९३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ५८० इतकी झाली आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २० रुग्णांचा समावेश आहे. तर लांजातील १, रायपाटण (ता. राजापूर), दापोली १२, कामथे (ता. चिपळूण), देवरूख १, कळंबणी (ता. खेड) १६ आणि अँटीजेन टेस्ट केलेल्या ३० जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच हजाराच्या पार गेला आहे.

बुधवारी ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील ५३ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील ६८ वर्षीय महिला, पूर्णगड येथील ६१ वर्षीय रुग्ण तसेच खेर्डी (ता. चिपळूण) येथील ८६ वर्षीय रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या आता ८७ झाली असून, मृत्यूचे प्रमाण ३.४९ टक्के आहे.

Web Title: corona virus: The number of corona victims in Ratnagiri district has crossed two and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.