corona virus-पाचल गावाने करून घेतले क्वारंटाईन, गावात येणारे सर्व मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:33 PM2020-03-24T13:33:17+5:302020-03-24T13:35:32+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पाचलकडे येणारे तीनही मार्ग बंद करुन गावात प्रवेशबंद करताना क्वारंटाईन करुन घेतले आहे. मंगळवारी सकाळपासून हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाचलकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक रोखून धरण्यात आली होती.
राजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पाचलकडे येणारे तीनही मार्ग बंद करुन गावात प्रवेशबंद करताना क्वारंटाईन करुन घेतले आहे. मंगळवारी सकाळपासून हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाचलकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक रोखून धरण्यात आली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पाचल गावाने क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. पाचलकडे येणारे रायपाटण, कारवली व तळवडे असे तीन मार्ग असून या तिन्ही मार्गावरुन गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सर्व ठिकाणचे मार्ग रोखून धरण्यात आले आहेत. रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे कर्मचारी पाचलमधील स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने सज्ज आहेत.
पाचलकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक अडविण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक खरेदीसाठी आलेल्यांना पाचलमध्ये प्रवेश दिला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पाचल ग्रामपंचायतीने गावाला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील कोणी व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही आणि कोणी आत येऊ शकत नाही.