corona virus in ratnagiri- आमच्या गावात कोणीही येऊ नका... जिल्ह्याच्या सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:43 PM2020-03-25T17:43:41+5:302020-03-25T17:45:31+5:30

गावातील जनतेला कोरोनाचा धोका कळला असल्याने आता रत्नागिरी शहरातील मांडवी, कारवांचीवाडी - धनावडे वाडी, वरवडे आदी गावांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत. जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे - परशुराम आणि राजापूर तालुक्यातील पाचल गावानेही गावात बंदी घातली आहे.

corona virus in ratnagiri- Nobody should come to our village ... close the district boundary | corona virus in ratnagiri- आमच्या गावात कोणीही येऊ नका... जिल्ह्याच्या सीमा बंद

corona virus in ratnagiri- आमच्या गावात कोणीही येऊ नका... जिल्ह्याच्या सीमा बंद

Next
ठळक मुद्देआमच्या गावात कोणीही येऊ नका... जिल्ह्याच्या सीमा बंदजिल्ह्यात पाच गावे स्वत:हून झाली क्वॉरंटाईन,गावात येण्यास मनाई

रत्नागिरी : गावातील जनतेला कोरोनाचा धोका कळला असल्याने आता रत्नागिरी शहरातील मांडवी, कारवांचीवाडी - धनावडे वाडी, वरवडे आदी गावांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत. जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे - परशुराम आणि राजापूर तालुक्यातील पाचल गावानेही गावात बंदी घातली आहे.

कोरोना संसर्गावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून संशयितांना सेल्फ क्वॉरंटाईन किंवा होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. यासाठी जमावबंदी, संचारबंदी करावी लागत आहे. तरीही शहरातील लोकांना त्याचे गांभीर्य वाटत नाही. मात्र, गावांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत.

सध्या देशात कोरोनाने भयावह रूप धारण केले आहे. मुंबई - पुण्यासह आता रत्नागिरीतही कोरोनाचा रूग्ण सापडला असून, त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. देशातील अनेक लोक परदेशात राहतात. कोरोनाच्या भीतीने हे लोक मोठ्या प्रमाणावर देशात परतू लागले आहेत, तर काही आधीच आले आहेत.

परदेशातून आलेल्या लोकांकडूनच मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देशात परतलेल्या व्यक्तीची मोठ्या प्रमाणावर तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. देशात संसर्ग वाढू नये, यासाठी आलेल्या लोकांनाही खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईनमध्ये ठेवले जात आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही कडक पावले उचलली आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाने जिल्ह्यात जमावबंदी, जनता कर्फ्यू, लॉक डाऊन आणि अखेर संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही शहरातील नागरिक कोरोनाचा धोका तितकासा गांभीर्याने घेत नसल्यानेच पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे.

संचारबंदी असूनही नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य आणि पोलीस यंत्रणेसह इतर यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. मात्र, नागरिक यापासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.

सुशिक्षित म्हणवणाऱ्या शहरी भागात ही स्थिती असली तरी ग्रामीण जनता मात्र, वेळीच सावध झाली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आता या गावांना आपले विलगीकरण आपणच करण्याची गरज वाटत आहे.

त्यामुळे रत्नागिरीतील मांडवी तसेच तालुक्यातील पोमेंडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या कारवांची वाडी - धनावडेवाडी आणि वरवडे या गावांनी ह्यसेल्फ क्वॉरंटाईनह्ण पाळत आपल्या गावामध्ये येणाऱ्यांना आणि बाहेर जाणाऱ्यांनाही बंदी केली आहे.

या गावांनी बांबू किंवा दगड टाकून आपल्या गावची सीमा बंद केली आहे. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय वाडीत प्रवेश करू नये, अशा सूचनांचे फलकही लावले आहेत. आपल्या गावात किंवा वाडीत कुणालाच येऊ द्यायचे नाही, याबरोबरच आपल्या गावातीलही कुणाला बाहेर जाऊ द्यायचे नाही, अशी ठाम भूमिका या गावांनी घेतली आहे.

या गावांनी आता कोरोनाचा संसर्ग होऊ न देण्यासाठी स्वत:च खबरदारीची उपाययोजना करीत आपल्या गावातील प्रत्येकाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Web Title: corona virus in ratnagiri- Nobody should come to our village ... close the district boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.