corona virus - कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह, २७ संशयितांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:39 AM2020-04-20T11:39:08+5:302020-04-20T11:40:30+5:30
कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि वाढलेला लॉकडाऊन या वातावरणात रत्नागिरीला दुहेरी दिलासा मिळाला आहे. राजीवडा येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला असून, त्यासोबत एकूण २७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
रत्नागिरी : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि वाढलेला लॉकडाऊन या वातावरणात रत्नागिरीला दुहेरी दिलासा मिळाला आहे. राजीवडा येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला असून, त्यासोबत एकूण २७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
रत्नागिरीतील राजीवडा येथे कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. उपचारानंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर रविवारी त्याची दुसरी चाचणी घेण्यात आली. त्यातही तो निगेटीव्ह आला आहे.
रविवारी चाचणी घेण्यात आलेले जिल्ह्यातील २७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यात कळंबणी येथील सहा, दापोली येथील सहा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील १५ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यातील दोघेजण निगेटीव्ह झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण रुग्णालयात उपचार घेत आहेत.