कोरोनाची औषधे आणि किट मोफत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:43+5:302021-05-05T04:50:43+5:30
देवरुख : कोकणसह इतर भागात कोरोनाची औषधे मोफत देण्याचा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार संघटनेचे डाॅ. मनोज चव्हाण यांनी ...
देवरुख : कोकणसह इतर भागात कोरोनाची औषधे मोफत देण्याचा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार संघटनेचे डाॅ. मनोज चव्हाण यांनी केला आहे. या औषधांचे वाटप व डाॅक्टरांसाठी लागणारी विविध किटस् देण्याचा शुभारंभ देवरुख येथे सोमवारी करण्यात आला.
‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लढा देण्यासाठी लागणारी औषधे, फेस शिल्ड आणि पीपीई किटचा पूर्ण संच हे सर्व संगमेश्वर येथील देवरूख पंचायत समिती कार्यालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सान्वी संसारे, अनुराग कोचिरकर, सागर संसारे, संदीप परब, सनी प्रसादे, शेखर बने उपस्थित होते.
.......................................
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेचे डाॅ. मनाेज चव्हाण यांनी डाॅक्टरांसाठी आवश्यक असणाऱ्या किटसचे देवरूख येथे वाटप करण्यात आले.