CoronaVirus : आणखीन १३ कोरोनाचे रूग्ण, रुग्णांची संख्या ३३२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:20 PM2020-06-04T16:20:18+5:302020-06-04T16:21:55+5:30
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच होत आहे. गुरूवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखीन १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३२ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत १२४ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
रत्नागिरी : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच होत आहे. गुरूवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखीन १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३२ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत १२४ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
जिल्ह्यात आढळणारे कोरोनाबाधित रुग्ण हे सर्व मुंबईतून आलेले असून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, त्याचे अहवाल टप्प्याटप्प्याने येत आहेत. गुरूवारी सकाळी मिरज येथे पाठविण्यात आलेले अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालांमध्ये १३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरीत १, गुहागरात २, कळंबणीत ४, चिपळुणात ३ आणि संगमेश्वरात तिघांचा समावेश आहे.
मुंबईकर मोठ्या प्रमाणात गावी आले असून, त्यांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांवर ग्राम कृती दलातर्फे लक्ष ठेवण्यात येत आहे. क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनालाही नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.