CoronaVirus : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 01:02 PM2020-06-08T13:02:09+5:302020-06-08T13:02:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी काही अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाले. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी काही अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाले. या अहवालानुसार आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर चिपळूण तालुक्यातील कामथे येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १४ झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे स्वॅब तपासणीसाठी कोल्हापूर आणि मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल टप्प्याटप्प्याने जिल्हा रुग्णालयाला प्राप्त होत आहेत. सोमवारी सकाळी मिरज येथून काही अहवाल प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अहवालांमध्ये ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीतील एक आणि संगमेश्वरातील एकाचा समावेश आहे.
त्याचबरोबर चिपळूण तालुक्यातील कामथे येथील एकाचा ३ जून रोजी मृत्यू झाला होता. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचाही अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे. त्याचबरोबर ६ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७३ इतकी आहे. तर सध्या १७७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं