CoronaVirus: दिल्लीत तबलिग जमातीच्या कार्यक्रमात सहभागी रत्नागिरीतील 'ती' व्यक्ती निघाली कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 04:35 PM2020-04-03T16:35:41+5:302020-04-03T17:21:38+5:30

दिल्ली येथे तबलीग जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रत्नागिरीतील एका प्रौढाला कोरोना झाला आसल्याचे तपासणी अहवालावरुन निष्पन्न झाले आहे.

CoronaVirus: Corona patient found in Ratnagiri vrd | CoronaVirus: दिल्लीत तबलिग जमातीच्या कार्यक्रमात सहभागी रत्नागिरीतील 'ती' व्यक्ती निघाली कोरोनाबाधित

CoronaVirus: दिल्लीत तबलिग जमातीच्या कार्यक्रमात सहभागी रत्नागिरीतील 'ती' व्यक्ती निघाली कोरोनाबाधित

Next

रत्नागिरी : दिल्ली येथे तबलीग जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रत्नागिरीतील एका प्रौढाला कोरोना झाला आसल्याचे तपासणी अहवालावरुन निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी शहरातील हा ५९ वर्षाचा प्रौढ दिल्ली येथे गेला होता. ते १८ मार्चला दिल्लीहून रत्नागिरीत आले होते. मात्र ते स्वतःहून रुग्णालयात आले नाहीत. पोलीस यंत्रणेने शोध घेऊन त्यांना बुधवारी जिल्हा रुग्णालयात आणले. त्यांच्या थुंकीचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचे अहवाल रत्नागिरीत आला. तो पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे यंत्रणेवरील ताण वाढला आहे. दिल्लीला गेलेले अन्य चार जण जिल्हा रुग्णालयात असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Web Title: CoronaVirus: Corona patient found in Ratnagiri vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.