CoronaVirus News in Ratnagiri: जे. जे. रुग्णालयातून गावी आला अन् कोरोना पॉझिटिव्ह निघाला; प्रशासनाची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 10:28 AM2020-05-02T10:28:34+5:302020-05-02T10:49:03+5:30
CoronaVirus Marathi News Updates in Ratnagiri: चिपळूण आणि संगमेश्वर प्रत्येकी एक कोरोनाबाधीत रुग्ण सापडला
रत्नागिरी : जिल्ह्यात चिपळूण आणि संगमेश्वर या दोन ठिकाणी प्रत्येकी १-१ कोरोनाबाधीत रुग्ण सापडला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे.
चिपळूण येथे आढळलेला रुग्ण मुंबई येथील जे जे हॉस्पिटल येथून प्रवास करून आला आहे. या रुग्णाला अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले असून, निर्जंतुकीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. दुसरा रुग्ण संगमेश्वर येथे आढळला आहे. तो ठाणे येथून आला आहे. या रुग्णला अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले असून निर्जंतुकीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे छुप्या पद्धतीने मुंबई, पुणे येथून अनेकजण कोकणात येत आहेत. १४ एप्रिलनंतर रत्नागिरीत एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता दोघेजण सापडले आहेत. त्यामुळे चिपळूण आणि संगमेश्वर येथे तातडीने आवश्यक खबरदारी घेणे सुरू झाले आहे.
'या' व्यक्तींना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावंच लागणार
चिंताजनक! अवघ्या २४ तासांत वाढले २२९३ रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजारांवर
ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी