Coronavirus in Maharashtra - मुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:50 AM2020-05-19T11:50:34+5:302020-05-19T12:10:59+5:30

कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.

Coronavirus in Maharashtra - Mumbai must go down: Bhaskar Jadhav | Coronavirus in Maharashtra - मुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव

Coronavirus in Maharashtra - मुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव

Next
ठळक मुद्देमुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी

चिपळूण : कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.

ते म्हणाले की, आजही कोरोना ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला नाही. हा भाग सुरक्षित असल्याने शक्य तेवढ्या नागरिकांना गावी आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सलग आठ दिवस बससेवा सुरू करून चालत येणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांच्या माथी मारणेदेखील पूर्णत: चुकीचे आहे. या संकटात चाकरमान्यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक अथवा सेवा मिळालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भास्कर जाधव यांनी चाकरमान्यांसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही सांगितले. त्यांनी सांगितले की, मार्गताम्हाणे येथे तपासणी नाक्यावर विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून, तेथे शिवसेनेतर्फे तंबू, केबीन व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सावर्डे नर्सिंग सेंटर, कामथे येथील समाजकल्याण वसतिगृहाची डागडुजी करून तेथेही जादा खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.

तसेच गुहागरसाठी १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी चार जागांची पाहणी केली जात आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरेसा निधी उपलब्ध झाला असला, तरी आपण आपल्या आमदार निधीतून ५० लाख रूपये खर्च करण्यास परवानगी दिली आहे. या धर्तीवर सावर्डे येथेही कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.

 

Web Title: Coronavirus in Maharashtra - Mumbai must go down: Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.