Coronavirus : धक्कादायक! रत्नागिरीत सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 01:24 PM2020-04-14T13:24:47+5:302020-04-14T13:30:15+5:30
Coronavirus : रत्नागिरी साखरतर येथील 6 महिन्यांच्या बाळाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 9000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2455 वर पोहोचली आहे. याच दरम्यान रत्नागिरीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
रत्नागिरीत अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी साखरतर येथील 6 महिन्यांच्या बाळाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित महिलेच्या घरातील हे बाळ असून यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या 6 वर जाऊन पोहचली आहे.
#IndiaFightsCorona ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.
— Lokmat (@MiLOKMAT) April 14, 2020
संपूर्ण बातमीसाठी क्लिक करा-https://t.co/iDeLXixiLfpic.twitter.com/zoW5HSlD0D
कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 119,718 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,925,528 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 452,177 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावाhttps://t.co/FacCEZkamp#CoronaUpdatesInIndia#technology#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावा
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन जेवण मागवणं पडलं महागात, बसला तब्बल 50 हजारांचा फटका
Coronavirus : भाषणाआधी पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...
Coronavirus : 'देशाला स्मार्ट उपायांची गरज', राहुल गांधींचा मोदींना सल्ला