CoronaVirus कोरोनाचा मुंबई ते रत्नागिरी प्रवास; जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 10:50 PM2020-05-06T22:50:58+5:302020-05-06T22:53:16+5:30
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रात्री उशिरा ही माहिती दिली.
रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारी रात्री आणखी दोन कोरोनाबाधीत रूग्ण सापडले आहेत. खेड तालुक्यातील कळंबणी आणि चिपळुण तालुक्यातील कामथे या दोन रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १७ झाली आहे.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रात्री उशिरा ही माहिती दिली. मंगळवारी एकाच दिवशी चार कोरोनाबाधीत रुग्ण सापडले. बुधवारी पुन्हा दोन रूग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे दोन्ही रूग्ण मुंबईहून रत्नागिरीत आले होते.
जिल्ह्यात सापडलेल्या १७ रुग्णांपैकी पाच पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ११ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus उद्धव ठाकरेंना मोठे यश; रेल्वे, लष्कराची रुग्णालये वापरण्यास केंद्राची परवानगी
CoronaVirus ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपली? गडकरींची मोठी घोषणा
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण
OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली
CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले