कोव्हॅक्सिन लस सुरक्षित : बाळ माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:45+5:302021-04-02T04:32:45+5:30
रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात बाळ माने यांनी काेविडची लस घेतली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले, माधवी ...
रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात बाळ माने यांनी काेविडची लस घेतली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले, माधवी माने उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित आहे. जिल्हा रुग्णालयात अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापन आणि स्वच्छता पाहायला मिळाली. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या लसीकरण मोहिमेचा लाभ ४५ वर्षांवरील व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन माजी आमदार, रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी केले.
लसीकरण विभागात गुरुवारी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनीही भेट दिली. त्या वेळी माजी आमदार बाळ माने यांनी त्यांच्याकडून लसीकरण मोहिमेसंदर्भात माहिती घेतली. बाळ माने म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही लस घेतली. आजपासून ४५ वयोगटावरील व्यक्तींनी लस घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे वातावरण आहे. सर्व परिचारिका चांगल्या पद्धतीने लसीकरण मोहीम राबवत आहेत. या लसीची कोणतीही रिअॅक्शन नाही. लस घेणाऱ्या सर्वांना माहिती समजावून सांगितली जाते आणि लस घेतल्यावर किमान अर्धा तास येथे थांबवून ठेवतात. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जनतेने घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे. ४५ वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी, २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यायचा आहे. लस घेतली तरीही मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.