कोविड लसीकरणात सुसूत्रता आणावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:37+5:302021-04-29T04:23:37+5:30
चिपळूण : कोविड लस देण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने पुरेसे व योग्य नियोजन केलेले दिसत नाही. त्यासाठी तालुका आरोग्य ...
चिपळूण : कोविड लस देण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने पुरेसे व योग्य नियोजन केलेले दिसत नाही. त्यासाठी तालुका आरोग्य विभागाने लसीकरणात सूसुत्रता आणायला हवी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.
मुळात ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जी गावे आहेत, त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. ज्येष्ठांना प्रथम प्राधान्य द्यावे. ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांना प्राधान्य द्यावे. लसीकरण केंद्रावर बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय करावी. टोकन दिल्यावर लोकांनी घरी न जाता रांगेत बसून राहावे. नर्सेस, डॉक्टर यांनी संयम ठेवावा, लोकांवर ओरडू नये. लोक पहाटे ४ वाजता लसीकरण केंद्रावर जातात. तेथे विजेची सोय असावी. डॉक्टर, नर्सेस यांनी किमान सकाळी ८.०० वाजता लसीकरणास सुरुवात करावी. लसीकरणाची वेळ निश्चित करून जाहीर करावी. लस उपलब्ध कधी होणार हे जाहीर करावे. अशा प्रकारे योग्य नियोजन करावे व जनतेने संयम ठेवून आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सीताराम शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.