कोविड लस आणि डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:30 AM2021-04-18T04:30:23+5:302021-04-18T04:30:23+5:30

मगपुढे नेहमीप्रमाणे सलग तीन दिवस डाॅ. दिवाण यांच्याकडे जाऊन टायफॉईडचा ‘कोर्स’ पूर्ण झाला. डाॅ. दिवाण यांच्या मते कोणत्याही व्हायरल ...

Covid vaccine and doctor | कोविड लस आणि डॉक्टर

कोविड लस आणि डॉक्टर

Next

मगपुढे नेहमीप्रमाणे सलग तीन दिवस डाॅ. दिवाण यांच्याकडे जाऊन टायफॉईडचा ‘कोर्स’ पूर्ण झाला. डाॅ. दिवाण यांच्या मते कोणत्याही व्हायरल तापाची सिम्टम्स् महिनाभरापर्यंत तरी शिल्लक राहते.

टायफॉईडच्या गोळ्या संपतात न संपतात तोच सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य असल्याचे शासकीय फर्मान आले. नियोजनानुसार आसूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमच्या चाचणीसाठीचा दिवस उजाडला. दुपारच्या उन्हामुळे अधिकचे तापमान दिसायला नको म्हणून थोडा लवकरच मी आराेग्य केंद्रात पोहाेचलो. तोपर्यंत मनात अनेक शंकांनी घर केले होतेच. कोरोना चाचणीबाबतच्या अफवा कानांवर येत होत्याच. माझ्या टायफॉईडची सिम्टम्स कोरोनाच्या पठडीत तर बसणारी नसतील ना याची भीती होती. कोरोनाची आर.टी.पी.सी.आर. चाचणी झाली आणि पुढचे दोन दिवस काही शांत झोप लागली नाही. सुदैवाने तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि जीव भांड्यात पडला. एक बरे झाले की, कोरोना चाचणीविषयीच्या अफवांनाही माझ्या मनाने पूर्णविराम दिला.

परवा पुन्हा कोरोना लसीकरणाचे नवे फर्मान आले आणि मनात तशीच धाकधूक घेऊन आसूद प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणे झाले. या लसीकरणाबाबतच्या अफवांही काही कमी नाहीत. एखादा कणखर मनाचा मनुष्यही अशा अफवांमुळे विचलित होतो. पण त्याची कुणाला पर्वा नाही. लसीकरणासाठी भली मोठी रांग आणि बाहेर रणरणते ऊन! लस घेतल्यावर काही विपरित तर होणार नाही ना याची धास्ती वाटू लागली. त्यात माझा क्रमांक तसा शेवटीच होता. आसूद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी असलेले डाॅ. शिंदे सगळ्यांकडून अगदी नियोजनपूर्वक काम करून घेत होते. सर्वांना आवश्यक माहिती देऊन मनातली भीतीही दूर करीत होते. अर्धी रांग पुढे गेली आणि लसीकरणासाठी नोंदणी करणारी सिस्टीम नेटवर्क कनेक्टीव्हीटी बंद पडल्याने थांबली. अर्धा तास उलटून गेला तरी नेटवर्क कनेक्टीव्हीटी

काही सुरळीत होईना. डाॅ. शिंदेनी संबंधित सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेला याबाबत विचारले तर हाॅस्पिटलमध्येच त्या संदर्भातील ‘मेजर फाॅल्ट’ झाला असून तो तिथे येऊनच दुरुस्त करावा लागणार असल्याचे पलीकडून सांगण्यात आले. लसीकरणासाठीच्या रांगेत अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकही होते. रांगेत चूळबूळ सुरू झाली तसे डाॅ. शिंदे स्वतः गाडीवर स्वार झाले आणि वीस-पंचवीस मिनिटांच्या अवधीतच संबंधित कामकरणारे टेक्निशियन सोबत घेऊन आले.

कोविड लस घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला डाॅ. शिंदेंनी खूप मानसिक आधार व भरवसा दिला. मी कोविड लस घेतल्यावर अर्ध्या तासाने घरी निघालो तर डाॅक्टरांनी तुमचे कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेट व्हाॅट्स ॲपवर पाठवणार असल्याचे सांगितले. मी घरी पोहोचेपर्यंत मला माझे कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेट मिळालेही होते. त्या दिवशी संध्याकाळी मला अचानक भरपूर ताप आला. अंगदुखी सुरू झाली. व्हॅक्सिन घेतलेला उजवा हातही सुजला आणि दुखू लागला. मी खूप घाबरलो. डाॅक्टरांना व्हाॅटस् ॲपवर मेसेज केला. पण डॉक्टरांनी खूप धीर दिला. ताप येणे, अंग दुखणे नाॅर्मल असल्याचे ते म्हणाले. मात्र, ताप वाढतच गेला आणि त्यासोबत माझी धाकधूकही. त्यादरम्यान दोन-चार वेळेस मेसेज करून डाॅक्टरांनी माझी पुन्हा विचारपूस केली व पुन्हा धीरही दिला. अखेर दुसऱ्या दिवशी मला ताप सोसवेना तेव्हा डाॅक्टरांनी मला त्यांनी सुचविलेल्या गोळीचे दुपारी व रात्री डोस घेण्यास सांगितले. रात्री दुसरा डोस घेतल्यावर मात्र ताप कमी होत गेला. आज कोविड व्हॅक्सिन घेऊन तीन दिवस झालेत. आता थोडी अंगदुखी सोडली तर बरे वाटत आहे. मी या दोन दिवसांत भीतीने गर्भगळीत झालो असताना वेळोवेळी मला धीर देऊन डॉ. शिंदे यांनी खूप मोठा मानसिक आधार दिला. ग्रामीण भागात राहून रात्रंदिवस रुग्णसेवा करणारे डाॅ. शिंदेंसारखे वैद्यकीय अधिकारी सर्वसामान्य रुग्णांसाठी खरेच देवदूत आहेत.

- बाबू घाडीगांवकर, जालगांव, दापोली.

Web Title: Covid vaccine and doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.