पांगरीखुर्द गाव परिसरात गव्याचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:03+5:302021-04-13T04:30:03+5:30
राजापूर : तालुक्यातील पांगरीखुर्द गाव परिसरात गव्याचा धुडगूस वाढला असून, दोन दिवसांपूर्वी गावातील रहिवासी सुरेश सखाराम तावडे यांच्या सुमारे ...
राजापूर : तालुक्यातील पांगरीखुर्द गाव परिसरात गव्याचा धुडगूस वाढला असून, दोन दिवसांपूर्वी गावातील रहिवासी सुरेश सखाराम तावडे यांच्या सुमारे शंभर ते दीडशे काजूच्या झाडांची गव्याने नासाधूस केली आहे. त्यामध्ये सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या पांगरीखुर्द गाव परिसरात अचानक गवा आला आणि त्याचा उपद्रव सुरू झाला आहे. पांगरीखुर्दमधील रहिवासी सुरेश सखाराम तावडे यांच्या काजूच्या बागेत दोन दिवसांपूर्वी गव्याने घुसून सुमारे शंभर ते दीडशे मोठ्या काजूच्या झाडांची नासधूस केली. त्यात त्यांचे सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, वन विभागाच्या राजापूरच्या अधिकाऱ्यांनी पांगरीखुर्द येथे जाऊन गव्याने नुकसान केलेल्या काजूच्या झाडांची पाहणी केली आहे.