चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची भीती वाटते - अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 07:10 PM2019-09-21T19:10:56+5:302019-09-21T19:13:40+5:30

१० वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील. त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवून खेकडे कसे धरण फोडतात हे दाखवून देईल, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

The crabs are scared when they come to Chiplun - Amol Kolhe | चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची भीती वाटते - अमोल कोल्हे

चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील चौपाटीवरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रेद्वारे शुक्रवारी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी आयोजित सभेला जनसमुदाय उपस्थित होता.

Next
ठळक मुद्दे चिपळुणात युतीला चिमटा

 

चिपळूण : चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची खूप भीती वाटते, असे सांगत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टिका केली. तिवरे धरण फुटले व २३ जण मृत्यूमुखी पडले, अनेक घरे उद्ध्वस्त झाली. आया-बहिणींचे कुंकू पुसले गेले, कच्ची-बच्ची अनाथ झाली आणि सत्तेत असलेले मंत्री खेकड्यांनी धरण फोडले, असे बेजबाबदार विधान करतात. १० वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील. त्यांना येत्या
विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवून खेकडे कसे धरण फोडतात हे दाखवून देईल, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील चौपाटीवरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रेद्वारे शुक्रवारी
शक्तीप्रदर्शन केले. यावेळी आयोजित सभेला जनसमुदाय उपस्थित होता.गुहागरहून शिवस्वराज्य यात्रा उक्ताड येथे आल्यानंतर तिचे स्वागत करण्यातआले. तेथून दुचाकी रॅली काढण्यात आली.

डॉ. कोल्हे म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात असलेले सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा सर्वात जास्त वापर जर कोणी केला असेल तर या सरकारने केला आहे. सत्तेत असूनसुद्धा
अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी ते काहीच करू शकले  नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेला शिवाजी महाराजांचे नाव दिले आणि फसवी कर्जमाफी केली. शिवाजी महाराजांनी उभारलेले गड, किल्ले हे भाड्याने
देण्याचा निर्णय घेतात, ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.

कोल्हे पुढे म्हणाले की, सत्तेत समान भागीदार असलेली शिवसेना गत पाच वर्षात काहीच करू शकलेली नाही. शेतकऱ्यांसाठी शिवराय हे शेवटपर्यंत लढले; पण सेना-भाजपच्या राज्यात १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात हा महाराजांचा अपमान नव्हे काय? असा सवाल करत खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवसेना व भाजपवर जोरदार टीका केली.

Web Title: The crabs are scared when they come to Chiplun - Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.