दरड कोसळल्या; कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:29 PM2019-08-26T13:29:20+5:302019-08-26T13:32:13+5:30
पाडी - कुलशेखर भागात दरडी कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या मार्गावरील ३ गाड्या अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. ही माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या ज्या स्थानकातून सुटते तेथून दुसऱ्या दिवशी त्या कोकण रेल्वे मार्गावरून धावतात.
रत्नागिरी : पाडी - कुलशेखर भागात दरडी कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या मार्गावरील ३ गाड्या अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. ही माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या ज्या स्थानकातून सुटते तेथून दुसऱ्या दिवशी त्या कोकण रेल्वे मार्गावरून धावतात.
कोकण रेल्वे मार्गावरून रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये २५ ऑगस्ट रोजी सुटणारी १९२६१ कोचुवेली - पोरबंदर, २५ रोजी सुटणारी १२९७७ मरुसागर, २५ रोजी मडगाववरून सुटणारी १०२१५ मडगाव - एर्नाकुलम, २६ रोजी सुटणारी १०२१६ एर्नाकुलम - मडगाव, २६ रोजी सुटणारी व त्याच दिवशी कोकण रेल्वे मार्गावर धावणारी १६३४५ नेत्रावती, २६ रोजी सुटणारी १९५७७ तिरुनेलवेली - जामनगर, २६ रोजी सुटणारी २२११४ कोचुवेली - कुर्ला, २६ रोजी सुटणारी १२२१७ कोचुवेली - चंदीगड या गाड्यांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त २५ रोजी सुटणारी १६३४६ शोरनुर - वाडी - पुणेमार्गे, २५ रोजी सुटणारी १२६१८ मंगला : मथुरा इटारसी शोरनुरमार्गे, २५ रोजी सुटणारी १२६१७ मंगला : शोरनुर - इरोड - इटारसी - मथुरामार्गे या गाड्या अन्य मार्गावरून वळवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.