चिपळुणातील माजी नगरसेवकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:24+5:302021-05-18T04:32:24+5:30
चिपळूण : कोरोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमाचे पालन न करता शहरातील जुना स्टँड परिसरात हॉटेल ठिकाणी गर्दी जमविल्याप्रकरणी ...
चिपळूण : कोरोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमाचे पालन न करता शहरातील जुना स्टँड परिसरात हॉटेल ठिकाणी गर्दी जमविल्याप्रकरणी शनिवारी एका माजी नगरसेकांवर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रमेश महादेव खळे (वय ५०, रा़ खेंड, कांगणेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस सुशांत तुकाराम जाधव यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खळे याने शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जुना बसस्थानक शेजारील हॉटेल साईकृपा हे हॉटेल सुरू ठेवले होते. या हॉटेलच्या मागे ग्राहकांची गर्दी जमविल्याने कोविड या साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्याकरिता व रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्याकरिता शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणतीही खबरदारी घेतली नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालनही केले नाही. तसेच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होईल असे वर्तन केले. याचबरोबर उद्धव लक्ष्मण देवळेकर (वय ४३, रा़ शिरगाव बाजारपेठ) याने शिरगाव बाजारपेठ येथे वडापाव सेंटर दुकान सुरू ठेवले असल्याने वडापावचे दुकानामध्ये लोकांची गर्दी करून कोविडच्या नियमांचे उल्लंघन केले.