चिपळुणातील तीन दुकानदारांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 03:20 PM2021-05-07T15:20:18+5:302021-05-07T15:21:18+5:30
CoronaVIrus Chiplun Ratnagiri : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील तीन व्यापाऱ्यांवर येथील पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही यापद्धतीने कारवाई सुरुच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील तीन व्यापाऱ्यांवर येथील पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही यापद्धतीने कारवाई सुरुच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. मोहन विष्णू चोचे (रा. वाणीआळी), नितीन दत्ताराम लोकरे (रा. परांजपे स्कीम, बहादूरशेख नाका, चिपळूण), संतोष धोंडू पेढांबकर, (रा. काविळतळी, जिव्हाळा मार्केट, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त दुकाने उघडली ठेवल्यास कारवाई केली जात आहे. त्यानुसार दुकानदार चोचे यांचे शहरातील बहादूरशेख नाका येथे मुंबई गोवा हायवे लगत संगम पान शॉप व जनरल स्टोअर्स असून, बुधवारी सायंकाळी ५ वाजता त्यांनी दुकान उघडले ठेवले होते.
तसेच नितीन लोकरे यांचे शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील एक्सेसरीजचे दुकान उघडे होते, तर शहरातील कविलतळी येथील जिव्हाळा सुपर बाजार येथे शेटर बंद ठेवून आतमध्ये पाच महिला कर्मचारी व चार ग्राहक आढळून आल्याने त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय भोसले यांनी दिली आहे.