कृषी विभागाची खरीप हंगामाकरिता पीक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:28+5:302021-06-09T04:39:28+5:30
चिपळूण : बळीराजाला प्रोत्साहन देण्याबराेबरच त्याचे मनोबल वाढवण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाकरिता पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या ...
चिपळूण : बळीराजाला प्रोत्साहन देण्याबराेबरच त्याचे मनोबल वाढवण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाकरिता पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत स्थानिक शेतकऱ्यांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राहुल आडके यांनी केले आहे. पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येणार आहे.
खरीप हंगामासाठी या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल अशी एकूण ११ पिके आहेत. प्रतितालुका किमान सर्वसाधारण गटासाठी १० वा आदिवासी गटासाठी ५ स्पर्धक संख्या असणे गरजेचे आहे. पीक स्पर्धांमध्ये सहभागी लाभार्थ्यांचे शेतावर त्या पिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. तालुक्यात पीककापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या - सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४ असणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल पिकांसाठी ३१ ऑगस्ट ही तारीख ठेवण्यात आली आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटात घेण्यात येणार आहे़ स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून कृषी कार्यालयात देणे गरजेचे आहे.