बाजारपेठेतील मुख्य मार्ग अडवल्यामुळे गर्दी नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:23+5:302021-05-03T04:25:23+5:30
खेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खेड नगर परिषद प्रशासनाने बाजारपेठेत येणारे दोन मुख्य मार्ग अडवून गर्दी नियंत्रणात आणण्याची ...
खेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खेड नगर परिषद प्रशासनाने बाजारपेठेत येणारे दोन मुख्य मार्ग अडवून गर्दी नियंत्रणात आणण्याची
शक्कल लढवली आहे. यामुळे बाजारपेठेतील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या प्रशासनाच्या सूचनांना नागरिकांकडून हरताळ फासण्याचे प्रकार सुरू आहेत. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. किराणा माल केवळ घरपाेच करण्याच्या सूचना असून, व्यापाऱ्यांनी अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. भाजीपाला व फळे विक्रेत्यांनाही शंकर मंदिरासमोरील मोकळ्या जागेत बसण्याची मुभा देऊन गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.
बाजारपेठेत गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बाजारपेठेतील मुख्य दोन मार्ग अडवण्यात आले आहेत. यामुळे बाजारपेठेतील वाहनांच्या वर्दळीला ब्रेक लागला असून नागरिकांची संख्याही रोडावली आहे. प्रशासनाचे पथक कोणत्याही क्षणी दाखल होत असल्याने कारवाईच्या भीतीने नागरिक विनाकारण बाजारपेठेत फिरण्यास धजावत नाहीत.
...............................
khed-photo22 खेड नगर परिषद प्रशासनाने बाजारपेठेत येणारे दोन मुख्य मार्ग अडवल्यामुळे बाजारातील गर्दी नियंत्रणात आली आहे.