वीकेंड लॉकडाऊन संपताच खेड बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:08+5:302021-04-13T04:30:08+5:30

khed-photo121 खेड शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करावीत अशा सूचना पोलिसांनी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून केली. ...

Crowd at Khed market as weekend lockdown ends | वीकेंड लॉकडाऊन संपताच खेड बाजारपेठेत गर्दी

वीकेंड लॉकडाऊन संपताच खेड बाजारपेठेत गर्दी

Next

khed-photo121 खेड शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करावीत अशा सूचना पोलिसांनी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून केली.

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : वीकेंड लॉकडाऊनची मुदत संपताच साेमवारी खेड बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. किराणा मालाच्या दुकानाबाहेर तर ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या हाेत्या. १५ तारखेनंतर शासनाने लॉकडाऊनचे संकेत दिल्याने वाण सामान व भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली हाेती. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाला. बाजापरपेठेतील वाढती गर्दी पाहता पाेलिसांनी वाहनाद्वारे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ या दरम्यान कडक वीकेंड लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे गेले दोन दिवस खेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. साेमवारी सकाळी वीकेंड लॉकडाऊन संपले आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने उघडायला सुरुवात केली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी केली हाेती.

बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याची खबर मिळताच खेड पोलिसांची व्हॅन बाजारपेठेत दाखल झाली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करावीत अशा सूचना पोलिसांनी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून केल्यानंतर ज्या दुकानदारांनी सकाळी आपली दुकाने उघडली होती त्यांनी कारवाईच्या भीतीने दुकाने बंद केली.

अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने वगळता अन्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, कारवाई करण्याची वेळ आणू नये, असे आवाहन खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.

Web Title: Crowd at Khed market as weekend lockdown ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.