पुढच्या १५ दिवसांच्या खरेदीसाठी पाली बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:07+5:302021-04-16T04:31:07+5:30

पाली : शासनाने १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याचे पाली बाजारपेठेत विभागातील ग्रामस्थांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जीवनावश्यक ...

Crowd in Pali market for next 15 days shopping | पुढच्या १५ दिवसांच्या खरेदीसाठी पाली बाजारपेठेत गर्दी

पुढच्या १५ दिवसांच्या खरेदीसाठी पाली बाजारपेठेत गर्दी

Next

पाली : शासनाने १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याचे पाली बाजारपेठेत विभागातील ग्रामस्थांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जीवनावश्यक दुकानांखेरीज इतरही सर्व दुकाने कमी-जास्त फरकाने उघडी असल्याने ती सर्वच्या सर्व दुकाने गर्दीने तुडुंब भरली होती. या दुकानांव्यतिरिक्त पानटपऱ्या, वडापाव व रस्त्यावरील फिरते व्यापारी यांचीही संख्या अधिक होती.

नियोजित लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळण्यात आले आहे. मात्र या दुकानांमध्येच विभागातील ग्रामस्थांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. एसटी बसेस व रिक्षा व्यवसाय बंद असल्याने येथील ग्रामस्थांना घरातच अडकून बसावे लागणार आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसांचा शिधा नेण्यासाठी ही गर्दी उसळली होती.

त्याचप्रमाणे रस्त्यावर बसलेल्या मिरची मसाला, कांदे-बटाटे यांच्या दुकानांवरही गर्दी होती. ग्रामीण भागात सुरू असलेली घरबांधणीची कामे असोत अथवा घर दुरुस्तीची कामे पावसाळ्याआधी पूर्ण व्हावीत यासाठी हार्डवेअरच्या दुकानांवरही नागरिकांची लगबग दिसत होती.

Web Title: Crowd in Pali market for next 15 days shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.