नागरिकांची केंद्रांवर होतेय गर्दी; पण लसीकरणासाठी लसच कुठाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:22 AM2021-06-17T04:22:09+5:302021-06-17T04:22:09+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांबरोबरच आता अन्य नागरिकही गर्दी करू लागलेत. मात्र, जिल्ह्यात येणारी लस अपुरी ...

Crowds of citizens at the centers; But where is the vaccine for vaccination? | नागरिकांची केंद्रांवर होतेय गर्दी; पण लसीकरणासाठी लसच कुठाय

नागरिकांची केंद्रांवर होतेय गर्दी; पण लसीकरणासाठी लसच कुठाय

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांबरोबरच आता अन्य नागरिकही गर्दी करू लागलेत. मात्र, जिल्ह्यात येणारी लस अपुरी असल्याने लसीकरण केंद्रावर जाऊनही अनेकांना परत यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात दररोज २५ हजार डोस देण्याची आरोग्य यंत्रणेची क्षमता असली तरीही तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्याची टक्केवारी रोडावलेली आहे.

केंद्र शासनाने आता १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात १८ वर्षांवरील सुमारे १३ लाख नागरिक आहेत. त्यांपैकी आतापर्यंत तीन लाख ४९ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटाला लस देणे तात्पुरते थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सुरू झाले आहे. परंतु सध्या ४५ वरील वयोगटालाच लस मिळेनाशी झाली आहे. जिल्ह्याला होणारा लसीचा पुरवठाच अपुरा असल्याने सध्या लसीकरण सुरू असलेल्या १३६ केंद्रांना ५० ते २०० डोस एवढेच मिळतात. त्यामुळे देताना नागरिकांमध्ये वाद होत आहे.

लसीकरण कमी होण्याचे कारण

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, जिल्ह्याला लस अपुरी मिळत असल्याने जिल्ह्यात सध्या जेमतेम २५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे.

केवळ २७ टक्केच लसीकरण झाले.....

जिल्ह्यात १८ वर्षांवरील सुमारे १३ लाख नागरिक आहेत. यांपैकी सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली होती. मात्र, लस अपुरी पडू लागल्याने या वयोगटाचे लसीकरण थांबविले आहे.

सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही दोन्ही लसींचा पुरवठा तेवढ्या प्रमाणात होत नाही.

जिल्ह्यातील १३६ केंद्रांवर सध्या लसीकरण होत असले तरीही या केंद्रांना क्षमतेपेक्षा कमी लसपुरवठा होत असल्याने ती कुणाला देणार, ही समस्या निर्माण होत आहे.

जिल्ह्याची दररोज २५ हजारांची क्षमता

जिल्ह्याची दररोज अगदी २५ हजार डोस देण्याची क्षमता आहे. सध्या दररोज जेवढी लस येत आहे, तेवढ्या लसींचे आपण नियोजन करीत आहोत. त्यामुळे आता राज्याकडून येणारा कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचा पुरवठा अधिक येत आहे.

- डाॅ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

लसीकरण कमी होण्याचे कारण

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, जिल्ह्याला लस अपुरी मिळत असल्याने जिल्ह्यात सध्या जेमतेम २५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे.

Web Title: Crowds of citizens at the centers; But where is the vaccine for vaccination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.