बाजारपेठेत लोकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:12+5:302021-06-16T04:41:12+5:30
रत्नागिरी : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दुकानांवर गर्दी झालेली दिसत आहे. बाजारपेठेत भरलेली असून रहदारीही वाढलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत ...
रत्नागिरी : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दुकानांवर गर्दी झालेली दिसत आहे. बाजारपेठेत भरलेली असून रहदारीही वाढलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
मच्छिमारांसमोर आर्थिक संकट
रत्नागिरी : गेल्या मासेमारी मोसमामध्ये अनेकदा वादळवारे झाल्याने मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. ते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर कर्जाचा बोजा असून त्याचे हप्तेही थकले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
लोकांच्या तयारीवर परिणाम
रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वीची लोक अगोदरच तयारी करतात. त्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, कोरोना प्रादुर्भाव असल्याने त्याचा परिणाम या तयारीवर झाल्याचे दिसून येत. पावसाळ्यापूर्वी तयारी करताना मसाले, सुकलेले मासे तसेच अन्य पदार्थ बनवून ठेवले जातात. मात्र, कोरोनामुळे अनेक लोक ही तयारी करू शकलेले नाहीत.
राजीवड्यात मोहल्ला क्लिनिकचा रुग्णांना फायदा
रत्नागिरी : शहरातील गजबजलेली लोकवस्ती असलेल्या राजीवडा गावामध्ये कोअर कमिटीने माेहल्ला क्लिनिक सुरू केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कोअर कमिटीने मोहल्ला क्लिनिकची स्थापना करून अनेकांचा जीव वाचविला होता. त्याप्रमाणे दुसऱ्या लाटेतही पोलिसांच्या सहकार्याने हे क्लिनिक सुरू करण्यात आले असून त्याचा रुग्णांचा फायदा होत आहे.
रस्ता खोदाईमुळे अपघात
रत्नागिरी : पावसाळा तोंडावर आला तरी शहर परिसरात नगरपरिषदेकडून खोदाईची कामे कमी झालेली नाहीत. ती कामे अजूनही सुरूच आहेत. शहरातील सन्मित्रनगर ते उद्यमनगरपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन लोक जखमी झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ
रत्नागिरी : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात अनेक लोकांना रोजगार गमवावा लागला. रस्त्याच्या कडेला असणाऱ्यांचे व्यवसायही बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगारच गेल्याने त्यांना दोनवेळचे जेवणही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे