गुहागर आगारातील विश्रांतीगृहाला सीआरझेडचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:32 AM2021-09-19T04:32:10+5:302021-09-19T04:32:10+5:30

असगाेली : सीआरझेडच्या जाचक अटींमुळे राज्य परिवहन विभागाच्या गुहागर आगारातील अनेक वर्षे मंजूर असलेले विश्रांतीगृहाचे काम अद्यापही रखडले असून, ...

CRZ obstructs rest house at Guhagar depot | गुहागर आगारातील विश्रांतीगृहाला सीआरझेडचा अडथळा

गुहागर आगारातील विश्रांतीगृहाला सीआरझेडचा अडथळा

Next

असगाेली : सीआरझेडच्या जाचक अटींमुळे राज्य परिवहन विभागाच्या गुहागर आगारातील अनेक वर्षे मंजूर असलेले विश्रांतीगृहाचे काम अद्यापही रखडले असून, याचा फटका आगारातील कर्मचाऱ्यांना बसत आहे. सीआरझेडची जाचक अट शिथिल करून आगारात सुसज्ज असे विश्रांतीगृह बांधावे, अशी मागणी परिवहनच्या गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांनी केली होती.

गुहागर आगारामध्ये कर्मचाऱ्यांसाठी छोटेसे विश्रांतीगृह आहे,परंतु त्याठिकाणी पाणी आणि स्वच्छतागृहाची चांगली सुविधा नाही. आगारामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना गुहागरात इतरत्र रहावे लागते. गुहागर आगारामध्ये परजिल्ह्यातील अनेक कर्मचारी नोकरी करतात. परंतु, आगारामध्ये विश्रांतीगृह व्यवस्थित नसल्याने हे कर्मचारी गुहागर व इतरत्र भाड्याने राहतात.

कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत विश्रांतीगृह बांधण्याचा प्रस्ताव परिवहन खात्यातर्फे मंजूर झाला आहे. त्याला सीआरझेडची अडचण येत आहे. गुहागरमध्ये आगाराची जागा ही शासकीय मालकीची असून, सीआरझेडच्या अटी शिथिल करून विश्रांतीगृहासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी एस. टी. कामगार संघटनेतर्फे वारंवार होत आहे.

सीआरझेडच्या अडचणी

सीआरझेडमुळे गुहागर शहरात अनेक बांधकामे रखडली आहेत. सीआरझेडची मर्यादा ५०० मीटर असल्या कारणाने अनेक शासकीय इमारतीही या कायद्यामध्ये येत आहेत. समुद्रालगत असणाऱ्या पोलीस व तहसील कार्यालय या इमारती अत्यंत जुन्या झाल्या असून, अत्यंत दाटीवाटीने या कार्यालयातील अनेक विभाग काम करीत आहेत. मध्यंतरी तहसील व पोलीस ठाणे यांच्या इमारती नव्या पद्धतीप्रमाणे करण्यासाठी प्रस्तावही करण्यात आला होता, परंतु केवळ सीआरझेडमुळे हे काम रखडले आहे. शासकीय इमारती होण्यासाठी तरी शासनाने हा कायदा शिथिल करावा, अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.

Web Title: CRZ obstructs rest house at Guhagar depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.