कवडीमोलाची कॅनिंग वारी

By admin | Published: May 30, 2016 10:17 PM2016-05-30T22:17:26+5:302016-05-31T00:35:47+5:30

बागायतदार अडचणीत : हापूसचा दिलासा नाहीच

Cuddy's Canning Vane | कवडीमोलाची कॅनिंग वारी

कवडीमोलाची कॅनिंग वारी

Next

शिवाजी गोरे -- दापोली
कोकण म्हटले की, हापूस डोळ्यासमोर येतो. कोकणचा हापूस राज्यातच नव्हे तर आता विदेशातही प्रसिद्ध आहे. आंब्याचा राजा हापूस संकटात सापडल्याने बागायतदारांच्या अडचणीत वाढ होत आहे. दरवर्षी गेल्या वर्षीचे पीक बरे होते, असे म्हणण्याची वेळ आता आंबा बागायतदारांवर येऊ लागली आहे. यावर्षी हापूस आंबा कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देईल, असे वाटत असताना यावर्षीसुद्धा आंब्याच्या राजाने बागायतदारांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे विदर्भातील संत्र व पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांप्रमाणेच कोकणातील आंबा बागायतदार शेतकरीही अडचणीत सापडला आहे.
कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूस सर्वत्र प्रसिद्ध आहे. हापूसने मार्केटमध्ये चांगले नाव कमावले आहे. परंतु, हाच हापूस आता निसर्गाच्या वक्रदृष्टीत सापडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. हापूसमधील दुर्गूण म्हणजे हापूसमधील साका. हा साका दूर करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. कारण हापूसमधील साक्यामुळे मार्के टमध्ये हापूस बदनाम होत आहे.
हापूसचे मार्के टींग करण्यात शेतकरी कमी पडत असून, कोकणात कमर्शियल आंबा बागायतदारच केवळ आंब्याचे मार्के टींग करीत आहे. आंब्याच्या झाडाला कल्टारचा हाय डोस दिला जात आहे. हापूसचे पीक आता नैसर्गिकऐवजी रासायनिक होऊ लागले आहे. काही शेतकरी मात्र आजही सेंद्रीय पद्धतीने हापूसचे पीक घेत आहेत. हापूस आंब्याचे पीक घ्यायचे असेल तर शेतकऱ्याने हापूसच्या झाडांची काळजी ही घ्यायलाच हवी.


मेहनत वाया... : सुरुवातीला चांगला भाव पण...
३० टक्के हापूस अजूनही झाडावर!
हंगामाच्या अंतिम टप्प्यात ३० टक्के आंबा अजूनही झाडावर आहे. हा आंबा कॅनिंगला पाठविला जात आहे. परंतु, कॅनिंगमधून शेतकऱ्याला फारसा फायदा होताना दिसत नाही. हापूस हंगामाच्या सुरुवातीला काही बागायतदारांना मात्र चांगला दर मिळाला. त्यानंतर कर्नाटक हापूसची ‘एंट्री’ वाशी मार्केटमध्ये झाल्याने आंब्याचे दर घसरले. आता तर कवडीमोलाने हापूस विक्री होत आहे.

हापूसचे दर पडले
आंबा हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला. परंतु, ज्यांचा आंबा उशिरा तयार झाला. त्यांना मात्र दरात फटका बसला आहे. शेवटच्या टप्प्यात आता मार्केटमध्ये हापूसचे दर १०० रुपये डझन झाले असून, त्यामुळे बागायतदार शेतकऱ्याला हे दर परवडणारे नाहीत. वर्षभर मेहनत करुन हापूसला योग्य दर मिळाला नाही तर आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.


आंबा नुकसानभरपाई मिळावी
आंबा मोहरण्याच्या कालावधीत पाऊस पडल्याने मोहरावर करपा पडून आंब्याचे पीक हातचे गेले. यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेत आंबेच आले नाहीत. काही बागायतदारांनी मात्र योग्य मशागत करुन थोडेफार पीक घेतले आहे. परंतु, पावसामुळे कोकणातील हापूसचे पीक हातचे गेल्याने आंबा नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.

Web Title: Cuddy's Canning Vane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.