प्रदूषण मुक्तीसाठी सायकलसवारी, रत्नागिरीकरांची किमयाच न्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 04:21 PM2019-12-08T16:21:13+5:302019-12-08T16:21:55+5:30
निरोगी राहण्यासाठी सायकल चालवणे महत्वाचे आहे, रत्नागिरीकरांना सायकलची सवय व्हावी
रत्नागिरी : रत्नागिरीत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आल होतं. वीरश्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि ट्रिनीटी हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचं हे दुसरं वर्ष असून, हजारोंच्या संख्येने रत्नागिरीकर या रॅलीत सहभागी झाले होते. आयटीआय ते भारतीय शिपीयार्ड असा 24 किलोमीटरचा टप्पा या रॅलीसाठी होता.
निरोगी राहण्यासाठी सायकल चालवणे महत्वाचे आहे, रत्नागिरीकरांना सायकलची सवय व्हावी, त्याचबरोबर आरोग्यासाठी सायकल चालवणे खूप महत्वाचं आहे, हाच संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी 'प्रदूषणमुक्त रत्नागिरी'चे स्वप्न या रॅलीतून जपले. रविवारी सकाळी 6 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनीही मोठ्या संख्येनं या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.