Cyclone Nisarga: वेंगुर्ले किनारपट्टीवरील गावांना एनडीआरएफच्या टीमची भेट; काळजी घेण्याचे केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 12:11 PM2020-06-03T12:11:11+5:302020-06-03T12:11:32+5:30
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्शवभूमीवर पहाणी
वेंगुर्ले : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्शवभूमीवर आज एनडीआरएफ च्या टीमने वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांना भेट देऊन वादळात घाबरून न जाता घ्यावयाची काळजी या बाबत सूचना दिल्या.
एनडीआरएफ च्या टीम सोबत आज सायंकाळी उपमुख्यकार्यकरी अधिकारी दीपाली पाटील, तहसिलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे तसेच संबंधित गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टीवरील वेंगुर्ले, वायंगणी, केळुस-कालविबंदर, निवती-मेढा आदी गावांना भेट देऊन वादळात घाबरून न जाता घ्यावयाची काळजी या बाबत सूचना केल्या. तसेच सुरक्षितता म्हणून कोणत्या उपाययोजना प्राथमिक स्वरूपात कराव्यात या बाबत मार्गदर्शन केले.