Video: मिऱ्या समुद्रात नांगर तुटल्याने जहाज भरकटले; काही खलाशी अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 10:18 AM2020-06-03T10:18:43+5:302020-06-03T10:19:10+5:30
जहाजाचा नांगर तुटल्याने जहाज भरकटल्याची माहिती समोर आली आहे.
रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर जोरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. याच दरम्यान मिऱ्या समुद्रात नर्मदा सिमेटचे जहाज भरकटले आहे.
जहाजाचा नांगर तुटल्याने जहाज भरकटल्याची माहिती समोर आली आहे. जहाजाला समुद्र किनाऱ्याजवळ आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मिऱ्या समुद्रात नांगर तुटल्याने जहाज भरकटले; काही खलाशी अडकल्याची भीती pic.twitter.com/RiJhTviued
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2020
सध्या रत्नागिरी, मालगुंड, जाकादेवी, पूर्णगड, पावस, हेदवी या भागात वाऱ्यांचा वेग ९० किमीपेक्षा जास्त आहे. तर जयगड किनाऱ्यावर हा वेग ११० इतका आहे. संगमेश्वर कोयनापर्यंत वाऱ्याचा वेग सध्या ९०किमीपेक्षा जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग ताशी १२० राहील असा अंदाज आहे.