उंबरशेत येथे वड जाळले

By admin | Published: March 23, 2017 03:07 PM2017-03-23T15:07:46+5:302017-03-23T15:07:46+5:30

ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

Dad burned in Umbarshet | उंबरशेत येथे वड जाळले

उंबरशेत येथे वड जाळले

Next


आॅनलाईन लोकमत
दापोली : तालुक्यातील उटंबर बेलेश्वर मंदिरासमोर मुख्य रस्त्यालगत असलेले पार असलेला वड जाळण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
येथील गट ग्रामपंचायतीने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी ठेकेदाराने दोन्ही पारांचे दगड काढले व तेथे असलेला गवत पाळापाचोळा काढण्यासाठी वेळ वाचावा यासाठी या पारावर वडाच्या दोन्ही बुंध्यांजवळ पेटवले होते. त्यानंतर पाणी टाकून आग विझवली नाही. नंतर ते काम आठ दिवस बंद ठेवण्यात आले. दरम्यान पोखरलेल्या वडाच्या आत घुमत असलेली आग कुणाच्याही लक्षात येण्यासारखी नव्हती. खोडाच्या आतमध्ये पेटून आतल्याआत प्रचंड प्रमाणात राख साचली होती. अचानक दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री शेंड्यापर्यंत भडका होवून खोडाच्या चारही दिशेने राखेचा ढिगारा बाहेर आल्याचे निदर्शनास आले. पहाटेच्या सुमारास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या व लगत रहात असलेल्या संजय पाटील यांच्या कर्मचाऱ्यांचे हे लक्षात आल्यावर ग्रामपंचायतीकडे संपर्क साधण्यात आला. घटनास्थळी काही ग्रामस्थ व पोलीस पाटील हजर असल्याचे निदर्शनात आले. या घटनेबाबत ग्रामपंचायत सदस्य दिलीप धावरे यांना विचारणा केली असता ते ग्रामपंचायत बघून घेईल याची जबाबदारी ठेकेदाराची असल्याचे धावरे यांनी सांगितले. ठेकेदाराने सुरूवातीला जाळलेले ग्रामपंचायत सदस्यांनी कल्पना आहेच शिवाय अनेक ग्रामस्थांनी पेटवलेले पाहीले आहे. यापुढे ग्रामपंचायत काय कारवाई करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dad burned in Umbarshet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.