पांगारी खाडीत राजरोजपणे वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:56 PM2020-11-13T12:56:57+5:302020-11-13T12:57:41+5:30

dapoli, sand, ratnagirinews दापोली तालुक्यातील पांगारी खाडीत राजरोसपणे होणाऱ्या वाळू उपशाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या वाळूमाफियांना एका राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या वाळू माफियावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राजकीय पाठबळामुळेच या प्रकरणात प्रशाशनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे.

Daily sand extraction in Pangari creek | पांगारी खाडीत राजरोजपणे वाळू उपसा

पांगारी खाडीत राजरोजपणे वाळू उपसा

googlenewsNext
ठळक मुद्देपांगारी खाडीत राजरोजपणे वाळू उपसा राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाला करावी लागत आहे डोळेझाक?

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील पांगारी खाडीत राजरोसपणे होणाऱ्या वाळू उपशाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या वाळूमाफियांना एका राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या वाळू माफियावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राजकीय पाठबळामुळेच या प्रकरणात प्रशाशनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे.

खाडीतील बेकायदेशीर वाळू उपसा करण्यामागे सत्ताधारी राजकीय पुढाऱ्याचा हात असल्याचे पंचक्रोशीत चर्चिले जात आहे. राजरोसपणे होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना कायद्यावर बोट ठेवून महसूल विभागाकडून चांगलेच हैराण केले जाते. अनेक वेळा लोकांना नाडले जाते. परंतु शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या वाळूमाफियावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, मंडणगड, खेड आणि दापोली या तालुक्यातील खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. या चोरट्या वाळूतून वाळूमाफिया कोट्यवधी रुपये नफा मिळवत आहेत. परंतु शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा होत नाही. काही तालुक्यातील वाळू उपसा बंद आहे. परंतु दापोली तालुक्यातील पांगारी येथे सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे समोर आले आहे. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ, बाणकोट या दोन ठिकाणी वाळूमाफियांकडून दरवर्षी सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे.
 

Web Title: Daily sand extraction in Pangari creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.