दलित मित्र तात्या कोवळे काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:08 PM2020-09-03T17:08:23+5:302020-09-03T17:09:21+5:30

चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे अभ्यासक व इतिहासाचे साक्षीदार, ज्येष्ठ समाजवादी, दलित मित्र व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष रघुवीर भास्कर उर्फ तात्या कोवळे (९७) यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले.

Dalit friend Tatya Kovale behind the curtain of time | दलित मित्र तात्या कोवळे काळाच्या पडद्याआड

दलित मित्र तात्या कोवळे काळाच्या पडद्याआड

Next
ठळक मुद्देदलित मित्र तात्या कोवळे काळाच्या पडद्याआडतात्या चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे अभ्यासक

चिपळूण : चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचे अभ्यासक व इतिहासाचे साक्षीदार, ज्येष्ठ समाजवादी, दलित मित्र व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष रघुवीर भास्कर उर्फ तात्या कोवळे (९७) यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले.

तात्या कोवळे हे सध्याच्या परांजपे हायस्कूल तर पूर्वीच्या श्रीराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवेत होते. चिपळूण शहरातील वडनाका येथील राजगृह येथील त्यांच्या निवासस्थानी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिली होती. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला होता.

तात्या स्वातंत्र्यसैनिक होते. त्याबरोबरच गांधीवादीसुध्दा होते. पूज्य गांधी प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष होते. प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. शहरातील गांधारेश्वर येथील गांधी स्मारक उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे १९८७-८८ मध्ये समाज सेवेच्या मौलिक कार्याबद्दल तात्या कोवळे यांना दलित मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. शहरातील अनेक संस्थांशी ते संबंधित होते. उत्तम वक्ते व लेखक असा त्यांचा लौकिक होता. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली होती. त्यांच्यावर शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

 

Web Title: Dalit friend Tatya Kovale behind the curtain of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.