दापोली पोलिसांचा सर्वपक्षीयांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:34 AM2021-08-19T04:34:17+5:302021-08-19T04:34:17+5:30

दापोली : गेल्या दोन वर्षांपासून चिंता वाढवलेल्या कोरोना महामारीच्या संकटकाळात जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात उत्कृष्ट ...

Dapoli police felicitated by all parties | दापोली पोलिसांचा सर्वपक्षीयांकडून सत्कार

दापोली पोलिसांचा सर्वपक्षीयांकडून सत्कार

Next

दापोली : गेल्या दोन वर्षांपासून चिंता वाढवलेल्या कोरोना महामारीच्या संकटकाळात जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तसेच पूरस्थितीत आपल्या जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचविणारे दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सभापती किशोर देसाई, शिवसेना विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदीप राजपुरे, युवा सेनेचे माजी राज्य विस्तारक ऋषिकेश गुजर, पंचायत समितीच्या सभापती योगिता बांद्रे, उपसभापती मनोज भांबिड, भाजपचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीराम ऊर्फ भाऊ ईदाते, भाजपचे शहराध्यक्ष संदीप केळकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक अविनाश मोहिते, मनविसेचे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश देवघरकर, कुणबी समाजाचे सूर्यकांंत म्हसकर, नरेंद्र आगरे, माजी नगरसेवक नितीन शिंदे, शिवाजी नगर (साखळोली) उपसरपंच सुभाष घडवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दापोली तालुकाध्यक्ष विजय मुंगसे, धीरज पटेल, संजय तांबे, जितेंद्र जाधव, राष्ट्रवादीचे दापोली शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक नितीन मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दापोलीच्या इतिहासात प्रथमच सवर्पक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दापोली पोलीस स्थानकातील पोलिसांचे कौतुक केले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस स्थानकातील बढती मिळालेल्या एम. आय. हळदे, अरुणा ढेरे, सुनील पाटील, सुहासिनी मांडवकर, सागर कांबळे, निधी जाधव, सोनाली गावडे, नीलेश जाधव, सखाराम निकम, मोहन देसाई, मयूर मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Dapoli police felicitated by all parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.