दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा १ डिसेंबरला लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 08:08 PM2020-11-27T20:08:18+5:302020-11-27T20:10:35+5:30
Dawood Ibrahim, khed, ratnagirinews अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके (ता. खेड) येथील वडिलोपार्जित सहा मालमत्तांच्या करण्यात आलेल्या लिलावानंतर लोटे येथे पेट्रोल पंपासाठी खरेदी केलेल्या भूखंडाचा १ डिसेंबरला लिलाव होणार आहे. स्मगलिंग ॲण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली.
खेड : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके (ता. खेड) येथील वडिलोपार्जित सहा मालमत्तांच्या करण्यात आलेल्या लिलावानंतर लोटे येथे पेट्रोल पंपासाठी खरेदी केलेल्या भूखंडाचा १ डिसेंबरला लिलाव होणार आहे. स्मगलिंग ॲण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली.
मुंबकेतील दाऊदच्या सातपैकी सहा मालमत्तांची लिलाव प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. या लिलावात एकूण २२ लाख ७९ हजार ६०० रुपये जमा झाले आहेत. मुंबके गावातील दाऊदचा दुमजली बंगला दिल्लीतील ॲड. अजय श्रीवास्तव यांनी ११ लाख ३० हजाराची बोली लावून व १५३ सर्वे क्रमांकाची मालमत्ता ४ लाख ३ हजार रुपयांना खरेदी केली होती.
वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी दाऊदच्या ४ मालमत्ता लिलावात विकत घेतल्या. लोटे येथील ३० गुंठे व्यावसायिक भूखंडासाठी ६१.४८ लाख राखीव किंमत ठेवण्यात आली होती.