डीबीजे महाविद्यालय लावणार एक हजार झाडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:46+5:302021-07-19T04:20:46+5:30

चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या १६५ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने ...

DBJ College to plant one thousand trees! | डीबीजे महाविद्यालय लावणार एक हजार झाडे !

डीबीजे महाविद्यालय लावणार एक हजार झाडे !

googlenewsNext

चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या १६५ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने एक हजार झाडे लावण्याचा संकल्प डीबीजे महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने केला आहे. वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून सहकार्य लाभले आहे.

वृक्षारोपणाचा कार्यक्रम पुढील खांदाटपाली स्मशानभूमी व कोळकेवाडी प्रयोगभूमी व खेर्डी येथे पाच दिवस सुरू राहणार आहे. सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला जाणार आहे. या वृक्षांचे जतन करण्याचा संकल्प सर्व स्वयंसेवकांनी केला. या कार्यक्रमासाठी चिपळूण परिक्षेत्र वनअधिकारी राजश्री कीर, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, राजाराम शिंदे, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संजय गव्हाळे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. चांदा, रजिस्टार पेढामकर, अनिल कलकुटकी, डी. बी. जे. महाविद्यालय एन. एस. एस. विभागप्रमुख प्रा. उदय बामणे, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. यू. डी. सूर्यवंशी व कार्यक्रमाधिकारी प्रगती कुबल, कनिष्ठ एन. एस. एस. विभागप्रमुख अरुण जाधव उपस्थित होते.

170721\3521img-20210717-wa0021.jpg

डीबीजे महाविद्यालय लावणार एक हजार झाडे!

Web Title: DBJ College to plant one thousand trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.