देवरुख: कोसुंब येथे सापडलेला मृतदेह नांदळजच्या तरुणाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 04:51 PM2022-08-09T16:51:50+5:302022-08-09T16:52:11+5:30

मुंबईला निघालेला निखिल चिरेखाणीकडे कसा आला, याची उकल झालेली नाही.

Dead body found in Kosumb belongs to youth from Nandlaj | देवरुख: कोसुंब येथे सापडलेला मृतदेह नांदळजच्या तरुणाचा

देवरुख: कोसुंब येथे सापडलेला मृतदेह नांदळजच्या तरुणाचा

Next

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब आडवा मारुती बसथांबानजीकच्या जुन्या चिरेखाणीमध्ये रविवारी अज्ञाताचा मृतदेह आढळला हाेता. या मृतदेहाची ओळख पटली असून, त्या तरुणाचे नाव निखिल प्रभाकर डोंगरे (२१) असे असून, तो नांदळज बोथलेवाडी येथे राहत होता. मात्र, या तरुणाच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

जुन्या चिरेखाणीत मृतदेह तरंगताना तेथील कामगारांना रविवारी दिसला हाेता. ही माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजू काकडे हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी त्या चिरेखाणीत उतरून मृतदेह बाहेर काढला होता. हा तरुण सुमारे तीस वर्षाचा असल्याचा अंदाज देवरुख पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, ओळख पटू शकली नव्हती. मृतदेहाचे विच्छेदन सोमवारी करण्यात आले. हा मृतदेह निखिलचा असल्याचे त्याची आई रोशनी डोंगरे आणि काका यांनी ओळखले. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पवार करीत आहेत.

मुंबईला निघाला हाेता

निखिल हा बुधवारी ३ रोजी नांदळजहून मुंबईला जाण्यासाठी सायंकाळी साडेपाचच्या बसने कोसुंबकडे आला होता. बुधवारी नऊ वाजण्याच्या दरम्यान त्याने आईला कॉल करून मुंबईला रेल्वे कनेक्शन बसने कोसुंब स्टॉप वरून जात असल्याची माहिती दिली हाेती. मात्र, मुंबईला निघालेला निखिल चिरेखाणीकडे कसा आला, याची उकल झालेली नाही.

Web Title: Dead body found in Kosumb belongs to youth from Nandlaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.