ढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:14 PM2020-01-09T17:14:02+5:302020-01-09T17:16:39+5:30

खेड शहरानजीकच्या भरणेनाका येथील एका बेकरीमध्ये ढोकळ्याच्या चटणीत मृत बेडूक आढळल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत तक्रार न दिल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र, सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.

A dead frog found in a dhoti sauce | ढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूक

ढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूक

googlenewsNext
ठळक मुद्देढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूकखेड शहरानजीच्या भरणेनाक्यातील प्रकार, सोशल मीडियामुळे प्रकार उघड

खेड : शहरानजीकच्या भरणेनाका येथील एका बेकरीमध्ये ढोकळ्याच्या चटणीत मृत बेडूक आढळल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत तक्रार न दिल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र, सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.

तळे येथील ग्राहकाने संबंधित बेकरीतून चार दिवसांपूर्वी ढोकळा खरेदी केला. तो घरी नेल्यानंतर मुलांना खाण्यासाठी देत असतानाच चटणीमध्ये मृतावस्थेतील बेडूक सापडल्याने त्यांना धक्काच बसला. मात्र त्यांनी याप्रकरणी तक्रार देण्यास टाळाटाळ केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र हा प्रकार व्हायरल झाला. सर्वत्र चटणीतील बेडकाचीच चर्चा आहे. या निमित्ताने आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बेकरीतील पदार्थ तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाला आता तरी वेळ मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

यापूर्वी बाजारपेठेतील एका बेकरीतून ढोकळा खाल्लेल्या पाचजणांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच भरणे मार्गावरील शिवाजी चौकातील एका बेकरीतील केकमध्ये अळ्या आढळल्या होत्या. याबाबत तपासणीत मुदत संपलेले पदार्थ आढळल्याने बेकरीला सील ठोकले होते. भरणे येथील एक अन्य बेकरीतून मंचुरियन मध्ये बँडेड पट्टी आढळल्याचा प्रकारे घडला होता. मात्र, या सर्व प्रकरणांवर पडदा टाकण्यात आला होता.

 

Web Title: A dead frog found in a dhoti sauce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.