वायूगळती झाल्याने कामगाराचा मृत्यू

By admin | Published: August 13, 2016 12:20 AM2016-08-13T00:20:00+5:302016-08-13T00:38:05+5:30

एक गंभीर : गरूडा केमिकल्स कंपनीतील दुर्घटना

Death due to dehydration | वायूगळती झाल्याने कामगाराचा मृत्यू

वायूगळती झाल्याने कामगाराचा मृत्यू

Next

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील गरुडा केमिकल कंपनीत गुरुवारी सायंकाळी वायूगळती झाली. यामध्ये मुकेश सुभाष पवार या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य एका कामगाराची प्रकृ ती गंभीर असून, त्याच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये गरुडा केमिकल ही कंपनी सन २००१पासून कार्यरत आहे. गरुडा केमिकल कंपनी ही राजेंद्र गोगटे यांच्या मालकीची असून, या कंपनीमध्ये एम. ए. जी. सायलीक अ‍ॅसिड या केमिकलचे उत्पादन घेतले जाते. यासाठी लागणारा कच्चा माल (टुक्लोरो इथेनॉल) हे द्रवरूप रसायन ड्रममधून बाहेर काढत असताना या रसायनाचा घातक वायू हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर मिसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या मुकेश सुभाष पवार (२९, रा. नातूनगर, खेड, सध्या आवाशी) व अनिल गंगाराम हळदे (३५, रा. चिरणी, ता. खेड) या दोन कामगारांना वायूची बाधा झाली. दोन्ही कामगारांना त्वरित चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. शुक्रवारी सकाळी सात वाजता मुकेश सुभाष पवार याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. अनिल हळदे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक कैलास घोसाळकर यांनी दिली.
लोटे सरपंच श्रेया चाळके व उपसरपंच सुरेंद्र गोवळकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कंपनीला भेट दिली. संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. लवकरच लोटे ग्रामपंचायतीमध्ये लोटे वसाहतीतील कंपनी व्यवस्थापकांची बैठक घेतली जाणार आहे. कंपन्यांमध्ये गेले काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांची संबंधितांकडून माहिती घेऊन कामगारांच्या सुरक्षिततेविषयी सुधारणा करण्याची विनंती केली जाणार असल्याची माहिती सरपंच श्रेया चाळके यांनी दिली.
या घटनेची नोंद लोटे पोलिस चौकीत झाली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. एस. काकडे करत आहेत. (वार्ताहर)
चौकट
सुरक्षेची साधने नाहीत ?
गरुडा कंपनीमध्ये सुरक्षा साधनांची कमतरता असून, गेल्या दहा वर्षांपासून येथे काम करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीही भरला जात नसल्याचे समजते. तसेच कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधाही पुरविल्या जात नाहीत. कंपनीमध्ये आग लागल्यास आग विझविण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे येथील कामगारांनी सांगितले.


कामगारांना अपुरी माहिती
गरुडा कंपनीमध्ये मुकेश सुभाष पवार हा कामगार मागील एक महिन्यापासून कामाला होता, तर अनिल हळदे हे गेली दोन वर्षे येथे काम करतात. घटना घडली त्यावेळी टुक्लोरो इथेनॉल हे रसायन दोनशे लीटरच्या ड्रममधून पन्नास लीटरच्या ड्रममध्ये खाली करण्याचे काम सुरू होते. हे काम एका रबरी पाईपच्या सहाय्याने केले जाते. मात्र, या दोन कामगारांना याची माहिती दिली गेली नसल्याने या कामगारांनी दोनशे लीटरचा ड्रम आडवा करून त्यातून टुक्लोरो इथेनॉल रसायन काढण्याचा प्रयत्न केला. तसेच या कामगारांकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने या घातक वायूची लागण दोघांना झाली.

Web Title: Death due to dehydration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.