रत्नागिरीतील मंडणगडात आढळलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:56 AM2022-12-28T11:56:56+5:302022-12-28T11:57:19+5:30

मंडणगड : मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पाल्ये गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा रुग्ण वयोवृद्ध असून, ...

Death of corona patient found in Mandangad in Ratnagiri, Health system on alert | रत्नागिरीतील मंडणगडात आढळलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

रत्नागिरीतील मंडणगडात आढळलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

googlenewsNext

मंडणगड : मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पाल्ये गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा रुग्ण वयोवृद्ध असून, या रुग्णाचा मंगळवारी (२७ डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे. कोरोनाचा पुन्हा शिरकाव होत असतानाच तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. तालुक्यात बसविण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट अद्याप सुरूच झालेला नाही.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा इतिहास पाहता त्याला दम्याचा आजार होता. तसेच हा रुग्ण तीन वर्षे मंडणगडमध्येच वास्तव्याला होता. हा रुग्ण नेहमीप्रमाणे रुग्णालयात तपासणीकरिता गेला असता डॉक्टरांना कोरोनाची काही लक्षणे दिसली. त्यांनी त्याची कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्याला तत्काळ दापोली येथे पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णाच्या सहवासातील इतर कोणालाही कोणतीच लक्षणे नसून, नागरिकांना घाबरण्याचे कोणतेच कारण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या लढ्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे रिक्त असून, केवळ एक डॉक्टर सेवेत आहे. सध्या दापोलीच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार आहे.

ऑक्सिजन प्लांट शोभेसाठीच

तिसऱ्या लाटेच्या अखेरच्या टप्प्यात ऑक्सिजन प्लांट बसविण्यात आला होता. मात्र, तो अद्याप सुरू केलेला नाही. कोरोनाचा धोका घोंगावत असताना तालुक्यातील आरोग्य यंत्रणा मात्र कोलमडलेल्या स्थितीत आहे.

Web Title: Death of corona patient found in Mandangad in Ratnagiri, Health system on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.