मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 03:36 PM2019-04-10T15:36:26+5:302019-04-10T15:45:28+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (10 एप्रिल) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

death of one person in the accident on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.बुधवारी (10 एप्रिल) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दीड तासाहून अधिक वेळ महामार्ग रोखला होता.

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (10 एप्रिल) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धर्मा पवार (59) असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दीड तासाहून अधिक वेळ महामार्ग रोखला होता.

महामार्गावरील सावर्डेनजीकच्या कोंडमळा येथे डंपर आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यात धर्मा पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर असंख्य लोक तेथे जमा झाले. सदर डंपर या भागात महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या तेजस कंपनीचा आहे. त्यामुळे कंपनीचे अधिकारी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही,अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी महामार्ग अडवला. जवळपास दीड तासाहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गुरव यांनी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर जमाव पांगला आहे. 

Web Title: death of one person in the accident on Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.