सप्टेंबरमध्ये मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 02:25 PM2020-09-30T14:25:04+5:302020-09-30T14:27:13+5:30

उशिराने होणारे निदान, तपासणी करण्याबाबतची उदासिनता आणि कोरोनाची भीती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांप्रमाणेच मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १२६ जणांचा मृत्यू सप्टेंबर महिन्याच्या २९ दिवसात झाला आहे. आजवर झालेल्या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील रूग्णांची संख्या सर्वाधिक असून, सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात झाले आहेत.

The death toll rose sharply in September | सप्टेंबरमध्ये मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ

सप्टेंबरमध्ये मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ

Next
ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ कोरोना तपासणीबाबत लोकांची भीती कायम

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : उशिराने होणारे निदान, तपासणी करण्याबाबतची उदासिनता आणि कोरोनाची भीती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांप्रमाणेच मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १२६ जणांचा मृत्यू सप्टेंबर महिन्याच्या २९ दिवसात झाला आहे. आजवर झालेल्या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील रूग्णांची संख्या सर्वाधिक असून, सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात झाले आहेत.

कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यानंतर पहिल्या चार महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात रूग्ण वाढत असले तरी मृतांची संख्या मर्यादीत होती. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढले. या काळात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला. एकीकडे बाजारात गर्दी वाढली आणि दुसरीकडे घराघरात माणसांची संख्या वाढली. त्यामुळे गणेश चतुर्थीनंतरच्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच दररोज रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे.

एप्रिल महिन्यात २, मे महिन्यात ७, जून महिन्यात १७ तर जुलैमध्ये ३३ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. जुलै महिनाअखेरीस जिल्ह्यातील मृतांची संख्या ५९ इतकी होती. ऑगस्ट महिन्यात ७६ जणांचा मृत्यू झाला आणि एकूण मृतांची संख्या १३५ पर्यंत गेली. सप्टेंबर महिन्यात तर त्या पुढचा कहर झाला आहे. २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात आणखी १२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृतांची संख्या २६१ इतकी झाली आहे.


भीतीमुळे अनेकजण आपला आजार लपवतात. लक्षणे असूनही तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे कोरोनाचे निदान होण्यात विलंब होता. त्यामुळे मृतांची संख्या वाढते. हे लक्षात घेऊनच राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केले आहे. त्याला सर्व लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि तपासणी करून घ्यावी.
- डॉ. अशोक बोल्डे,
जिल्हा शासकीय रुग्णालय


उशिरा दाखल

कोरोनाच्या भीतीने रूग्ण उपचारासाठी उशिराने रूग्णालयात येतात, हे मृत्यूचे मुख्य कारण आहे. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे न्युमोनिया वाढतो आणि त्यावर नियंत्रण आणता येत नाही. त्यामुळे मृतांची संख्या अधिक वाढते.

तपासणीच नको

तापाची किंवा कोरोनाची लक्षणे असूनही तपासणी करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. तपासणी करून घेण्यात झालेल्या विलंबामुळेही उपचार मिळण्यात वेळ जातो. त्याने आजार बळावत जातो.

घाबरल्यानेही..

कोरोनाची भीती हेही मृत्यूचे एक कारण आहे. बरे होण्यासाठी रूग्णाची इच्छशक्ती प्रबळ हवी. ती नसेल तर उपचाराला प्रतिसाद मिळत नाही.

नियम पाळा

सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझेशन यासारखे नियम पाळायलाच हवेत. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यावरच अधिक भर द्यायला हवा.

Web Title: The death toll rose sharply in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.