चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात ‘नो वेटिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:03 PM2022-07-19T17:03:13+5:302022-07-19T17:04:06+5:30

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवात अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला

Decision to run additional Ganesha special trains on Konkan railway line during Ganeshotsav | चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात ‘नो वेटिंग’

चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात ‘नो वेटिंग’

Next

शोभना कांबळे

रत्नागिरी : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. विशेषकरून कोकणात हा उत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जातो. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी जातात. याच दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवात अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोकण मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर आता दररोज सुटणाऱ्या नियमित गाड्यांबरोबाच साप्ताहिक गाड्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आता या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकारक होत आहे.  आता अन्य मार्गांवरील गाड्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईला ये - जा करणाऱ्या प्रवाशांबरोबरच नोकरी - व्यवसायानिमित्त अन्य जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याबाहेरून आलेल्यांसाठीही या मार्गावर रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

येत्या गणेशोत्सवातही चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात येणार, हे लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनेही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी

अन्य कामांसाठी मुंबई - रत्नागिरी अशा ये - जा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्यामुळे अचानक जावे लागल्यास वेटिंगवर राहावे लागते.

श्रावणातही गर्दी

श्रावणातही कोकणात येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे सध्या या मार्गावर अतिरिक्त विशेष गाड्याही सुरू केल्या आहेत.
 

गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांचा ओघ लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सध्या अनेक विशेष गाड्याही सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे सध्या या मार्गावरील गाड्यांमध्ये हाेणारी गर्दी कमी झाली आहे. -  सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे


गणेशोत्सवासाठी गाड्यांची खैरात

विशेष गाड्या            तारीख
मुंबई सेंट्रल - ठोकूर     २३, ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर  
ठोकूर -मुंबई सेंट्रल      २४,३१ ऑगस्ट व ७ सप्टेंबर    
मुंबई सेंट्रल- मडगाव    २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर (६ दिवस)      
मडगाव ते मुंबई          २५ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर (६ दिवस)      
वांद्रे - कुडाळ (साप्ता.)  २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर
कुडाळ - वांद्रे (साप्ता.)  २६ ऑगस्ट, २ आणि ९ सप्टेंबर

Web Title: Decision to run additional Ganesha special trains on Konkan railway line during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.