होळीसाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, गाडीचे वेळापत्रक.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:54 IST2025-03-10T17:53:20+5:302025-03-10T17:54:06+5:30
खेड : शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळूण- पनवेल मेमू स्पेशल साेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ०१०१८ व ०१०१७ क्रमांकाच्या ...

होळीसाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, गाडीचे वेळापत्रक.. वाचा सविस्तर
खेड : शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळूण- पनवेल मेमू स्पेशल साेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ०१०१८ व ०१०१७ क्रमांकाच्या चिपळूण- पनवेल मेमू स्पेशलच्या १३ ते १६ मार्चदरम्यान ८ फेऱ्या धावणार आहेत.
चिपळूण येथून दुपारी ०३:२५ वाजता सुटणारी मेमू स्पेशल रात्री ०८:३० वाजता पनवेल येथे पोहाेचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून रात्री ०९:१० वाजता सुटून मध्यरात्री २ वाजता चिपळूण येथे पोहाेचेल. या स्पेशल मेमूला आंजणी, खेड, कळंबणी, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापेवामने, वीर, गोरेगाव, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण स्थानकात थांबे देण्यात आले आहेत. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांतील चाकरमान्यांना मेमू स्पेशलमुळे दिलासा मिळाला आहे.
याव्यतिरिक्त मडगाव- पनवेल, मडगाव- एलटीटी या दोन स्पेशलच्या १६ फेऱ्या धावणार असल्याने चाकरमानी सुखावले आहेत. ०११०२/०११०१ क्रमांकाची मडगाव- पनवेल साप्ताहिक स्पेशल १५ व २२ मार्च रोजी धावेल. मडगाव येथून सकाळी ०८:०० वाजता सुटून सायंकाळी ०५:३० वाजता पनवेल येथे पोहाेचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून सायंकाळी ०६:२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०६:४५ वाजता मडगाव येथे पोहाेचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल करमाळी, थिवीम, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण स्थानकांत थांबेल.
तसेच ०११०४/०११०३ क्रमांकाच्या मडगाव- एलटीटी साप्ताहिक स्पेशलच्या ४ फेऱ्या धावणार आहेत. १६ व २३ मार्चला धावणारी स्पेशल मडगाव येथून सायंकाळी ०४:३० वाजता सुटून पहाटे ०६:२५ वाजता एलटीटीला पोहाेचेल. परतीच्या प्रवासात १७ व २४ मार्चला धावणारी स्पेशल एलटीटीहून सकाळी ०८:२० वाजता सुटून रात्री ०९:४० वाजता मडगाव येथे पोहाेचेल. २० एलएचबी डब्यांच्या स्पेशलला करमाळी, थिवीम, सावंतवाडी, कणकवली, विलवडे, कुडाळ, सिंधुदुर्ग, वैभववाडी, राजापूर, आरवली रोड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत.